जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्ली येथे दि. ६ व ७ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या ५ व्या राष्ट्रीय दिव्यांगजन क्रीडा स्पर्धेकरीता आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शना खाली दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान (रत्नागिरी) या संस्थेच्या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रशांत सावंत – गोळा फेक सुवर्ण पदक, थाळी फेक सुवर्ण पदक, सागर आईनकर – थाळी फेक सुवर्ण पदक, मंगेश चांदणे – थाळी फेक सुवर्ण पदक, गोळा फेक रौप्य पदक, हर्षद चव्हाण – गोळा फेक सुवर्ण पदक, थाळी फेक रौप्य पदक, जनार्दन पवार – गोळा फेक कांस्य पदक असे पाच सुवर्ण, दोन कांस्य, एक रौप्य अशी एकुण आठ पदके मिळवून महाराष्ट्र संघासाठी मोलाची कामगिरी केली.
या स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यातील दिव्यांग खेळाडूं सहभागी झाले होते. रत्नागिरीच्या दिव्यांग खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत उज्वल यश संपादन केल्याबद्दल, दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांचे पदाधिकारी कौस्तुभ बुटाला, सुनिल शिंदे, मंगेश कडंवईकर, रेणुका गोरीवले, पांडुरंग नाचरे, पल्लवी सावंत, प्रज्ञा जंगम, राजेश धारीया, गंगाराम आखाडे, मंदार खैर, एकनाथ जोशी, अल्पेश तावडे, संदीप आखाडे, संतोष मालशे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.