(नवी दिल्ली)
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी समान विचारधारेच्या व भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जवळपास सर्व विरोधी नेते उपस्थित होते. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र सावरकरांवरील टिप्पणीमुळे उद्धव ठाकरे गटाने या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचे मानले जाते.
राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर सरकारी बंगली खाली करण्याची नोटीस जारी केल्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष एकवटलेले दिसत आहेत. राहुल गांधी यांची अपात्रता व अदानी मुद्द्यावर नवी रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट झाली असल्याचे चित्र होते.
कांग्रेस अध्यक्ष व राज्यसभा में नेता प्रतिपक्ष श्री @kharge के चेम्बर में विपक्षी दलों की बैठक हुई।
बैठक में INC, DMK, SP, JDU, BRS, CPM, RJD, NCP, CPI, IUML, MDMK, KC, TMC, RSP, AAP, J&K NC & SS के नेता शामिल हुए।
संयुक्त विपक्ष अडानी महाघोटाले पर JPC बनाने की मांग कर रहा है। pic.twitter.com/5ahYH8SL3t
— Congress (@INCIndia) March 27, 2023
या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधीं, तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये जयराम रमेश, अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, प्रमोद तिवारी आणि रजनी पाटील यांचा समावेश होता. तर तृणमूल काँग्रेस खूप दिवसांनंतर काँग्रेसने बोलावण्यात आलेल्या विरोधकांच्या बैठकीत आणि आंदोलनात सामील झाली आहे.