(नवी दिल्ली)
नव्या संसदेच्या उद्घाटनादरम्यान सरकारचा निषेध करण्यासाठी तेथे जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कुस्तीपटू आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यामुळे रविवारी सकाळी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठा राडा झाला.
आंदोलक पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यावेळी आंदोलक पैलवान आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पहायला मिळाले.