( राजापूर )
दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आंबोळगड येथे प्रौढाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयित आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमित चंद्रकांत करगुटकर, अविनाश चंद्रकांत करगुटकर, संतोष बाबाजी नार्वेकर अशी संशयितांची नावे आहेत.
राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथे दारूसाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने प्रौढाला मारहाण केल्याची घटना घडली होती. यामध्ये सुहास सिताराम पारकर (65 )हे गंभीर जखमी झाले असून मृत्यूशी झुंज देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सुहास पारकर हे मुंबई येथून आपल्या कामासाठी आंबोळगड या गावी आलेले असताना आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे द्या अशी मागणी आरोपींकडून करण्यात येत होती. त्यानी दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने या आरोपींनी सुहास पारकर यांना घरात घुसून बेशुद्ध पडेपर्यंत जबर मारहाण केली असून त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवावे लागले आहे.
याप्रकरणी पोलीसानी अमित चंद्रकांत करगुटकर, अविनाश चंद्रकांत करगुटकर, संतोष बाबाजी नार्वेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करुनन्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक 17 जून पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे नाते पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या संदर्भात नाटे पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर सुरुवातीला आरोपींवर भा .द. वि. 307, 324, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल झगडे आणि अन्य सहकारी अधिक तपास करीत आहेत.