( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील पाग सुतारवाडी येथे दारुच्या नशेत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोहम राजेश सुतार (26, पाग, सुतारवाडी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत सोहम सुतार हा पाग येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता. यावेळी पाय घसरून तो नदीत पडला. 27 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. तेथे जमलेल्या लोकांनी त्याला पाण्याबाहेर काढून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.