(संगलट/ इक्बाल जमादार )
शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली दाभिळ येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे कार्यकर्ते यापुर्वी उबाठा व काँग्रेस पक्षात कार्यरत होते. बोरज शिवपाटयाचे उदय शिंदे, दाभिळचे शाखाप्रमुख सागर बैकर यांच्या प्रयत्नाने या कार्यकर्त्यांनी रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करायचा निर्णय घेतला असून दाभिळ व दाभिळ पंचक्रोशी भगवामय करण्याचा निर्णय या पदाधिका-यांनी घेतला आहे.
दाभिळ गावात गुणदेकर मॅडमच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी रामदासभाईंमुळेच मिळाल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच अनंत पालकर तसेच कै. बाबाराम गुणदेकर मास्तर, विष्णू गुणदेकर व सहका-यांची रामदासभाईंनी आवर्जून आठवण काढली. श्री. उदय शिंदे यांनी पूर्ण धामणदेवी जिल्हा परिषद गटात व तालुक्यात रामदासभाईसाठी काम करण्याचा निर्धार केलेला असून शिवसेना संघटना अधिक लवकर करण्यासाठी आपण दिवसरात्र काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी अमोल गुणदेकर, अक्षय गुणदेकर, शुभम साळवी, अजित जामसुतकर, ओकांर गुणदेकर, अमेय जामसुतकर, अनिल जामसुतकर, मयुर पालकर, प्रमोद गुणदेकर, आकाश गुणदेकर, अंकुश लांजेकर, नितीन शिरकर, मयुरेश बने, अमेय गुणदेकर, राजेश साळवी, श्रीकांत शिरकर, सागर शिरकर, वैभव रामागरे, गणेश जामसुतकर, विठ्ठल जामसुतकर, सचिन पालकर, संदिप पालकर, संदिप गुणेदकर, सचिन गुणदेकर, चेतन मोरे, प्रविण गुणदेकर, साहिल गुणदेकर, व सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, आण्णा कदम, शंकर कांगणे, सिकंदर जसनाईक, अरविंद चव्हाण, सचिन धाडवे, मिनार चिकले, स्पनिल सैतवडेकर, कुंदन सातपुते, संदिप आंब्रे, चंद्रकात चाळके, मनोज आंब्रे, शांताराम म्हसकर, मिलींद काते, करण चव्हाण, प्रशांत चव्हाण, व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.