(दापोली/प्रतिनिधी)
दापोली येथील पाळंदे समुद्र किनारी काल तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट बोट दिसून आल्याने येथील नागरिक घाबरले होते. हॉवरक्राफ्ट बोट अचानक समुद्रावर आल्याची चर्चा पसरू लागली. अनेकांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र थोड्याच वेळात या प्रकाराचा उलगडा झाला. या बोट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे येथील समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आली आहे, तांत्रिक दोष दूर झाल्यानंतर ही बोट मुंबईला रवाना होईल, असे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.