(मुंबई)
गेले अनेक महिने महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा आरोप आहे. यात सदानंद कदम आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब हे भागीदार असल्याची माहिती आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यामध्ये घोटाळ्याचा आरोप केला आहे. आता न्यायालयाने साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे. किरीट सोमय्या यांनी सोशल मिडियावर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. साई रिसॉर्ट विध्वंस प्रकरणात जिल्हा न्यायालय खेड/रत्नागिरी यांनी महाराष्ट्र शासन/जिल्हाधिकारी अपील मंजूर केले, असून हे रिसॉर्ट पडण्याचे आदेश देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या सोबत त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रतही जोडली आहे.
याआधी मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट पाडण्याची जाहीरात वृत्तपत्रातही देण्यात आली होती.
दापोली येथील साई रिसॉट हे नियमांचे भंग करून बांधल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. याची दखल घेत ईडीने अधि मनी लॉंड्रिंग प्रकरणी या रिसॉर्टवर कारवाई करत हा बंगला तात्पुरत्या स्वरूपात जप्त केला होता. दरम्यान, ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र देखील सादर केले आहे.
किरीट सोमय्या यांनी आरोप करत हे रिसॉर्टचे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप केला केला होता. तसेच या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा देखील आरोप करण्यात आला होता. दरम्यान, हे रिसॉट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. तब्बल दीड ते दोन वर्ष त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर ईडीने कारवाई केली होती. दरम्यान, आमदार अनिल परब यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावत या रिसॉटशी काही संबंध नसल्याचे देखील परब म्हणाले होते.
Anil Parab ka Dapoli Resort Tutega
Anil Parab Sai Resort Demolition issue, District Court Khed/Ratnagiri allowed Maharashtra Govt/Collector Appeal.
Court Ordered Demolition of Sai Resort.
( District Court Ordere/Judgement attached) @BJP4Maharashtra pic.twitter.com/RrqCqiEcJd
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) November 6, 2023