(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
दापोली परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक वाळू ने भरलेला डंपर पलटी झाला असल्याने दापोली शहरामध्ये या चोरट्या वाळू बाबत एकच खळबळ उडाली आहे. सदर डंपर पलटी झाला त्याठिकाणी कोणतेच वाकडे वळण किंवा खड्डे नव्हते, एका सरळ रस्त्यावर सदरचा डंपर पलटी झाला होता. सदरचा डंपर वाळूने भरलेला होता, पावसाळ्यामध्ये कोणत्या ठिकाणी वाळूचे उत्खनन होते, ते उत्खनन कोण करते आणि कुठून कोठे वाहतूक होते हा एक प्रश्न आता समोर येत आहे. दापोली तालुक्यामध्ये अद्याप चोरटी वाळू सुरू असल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
डंपर पलटी झालेला एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा पोलिसाला किंवा महसूल खात्याला कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्याने याच्यामागे गोडबंगाल काय ? महसूल खात्याने गेल्या अनेक महिन्यापूर्वी चोरटी वाळूवर कारवाई केली होती. मात्र सदरची वाळू अनेक ठिकाणी बंद आहे. मात्र ही रात्रीची वाळू कुठून येते व कोणामार्फत येते याचा तपास महसूल खात्याने करणे गरजेचे आहे. सदरच्या डंपरच्या मागे कोणतीच नंबर प्लेट सुद्धा दिसून येत नव्हती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तरी याबाबत प्रशासनाने सदर डंपरच्या बाबत चौकशी करून योग्य ते कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते.