राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हर्णे गणाचे पंचायत समिती सदस्य रउफ हजवाने यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने दापोली पंचायत समिती सभापती पद रिक्त झाले होते या रिक्त पदावर बांद्रे यांची वर्णी लागली आहे निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार यांनी ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली पंचायत समिती सभापती पदासाठी योगिता बांद्रे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली.
हजवानी यांच्या अविश्वास ठरावा नंतर दापोली पंचायत समितीत सभापतीपदी विराजमान होण्याची योगिता बांद्रे यांची शक्यता वर्तविली जात होती ७ मे रोजी दापोली पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत बांद्रे यांची बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा फ्रंट फूट वर आली आहे.
दापोली पंचायत समिती सभापती निवडीसाठी दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजयराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजी जाधव, प्रांतीकचे सदस्य मुजीब रुमाने ,तालुकाध्यक्ष श्री.जयवंत जालगावकर रवींद्र कालेकर,पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र गुजर,उप सभापती सौ.ममता शिंदे,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, पंचायत समिती सदस्य श्री.चंद्रकांत बैकर, पंचायत समिती सदस्य श्री.दीपक खळे,पंचायत समिती सदस्य श्री.काळूराम वाघमारे, श्री.श्रीकांत मुंगशे, दापोली तालुका युवक अध्यक्ष श्री.विजय मुंगशे, गव्हे ग्रामपंचायत सदस्य श्री.पप्या जोशी, श्री.माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सुजाता तांबे, श्री.सुधीर राणे, श्री.अविनाश निवाते, असुद ग्रामपंचायत उपसरपंच श्री.राकेश उर्फ पिंट्या माने, श्री.उमेश साठले, उपस्थित होते.