(संगलट / इक्बाल जमादार)
भविष्यात अवकाश यात्री होऊन अंतराळ संशोधन करण्याचा मानस असल्याचे, दापोली तालुक्यातील जि.प.शाळा कुडावळे नं.१ शाळेची विद्यार्थिनी अंशुल पाटील हिने इस्त्रो अभ्यास दौर्यासाठी झालेल्या निवडी प्रसंगी कुडावळे येथे ग्रामस्थव ग्रामपंचायत मार्फत आयोजित सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त केले.
जि.प.च्या नियमा प्रमाणे सातवीत शिकणार्या विद्यार्थ्याला नासा (अमेरिकेला) जाता येते, यामुळे अंशुल हिला तालुक्यात सर्वोच्च गुण मिळूनही ती सहावीच्या वर्गात असल्यामुळे ती नासा दौर्यापासून या वर्षी वंचित राहणार आहे. तरीही इस्त्रो दौराही नसे थोडके, म्हणत पुढच्या वर्षी नासाला जाण्याचा मान आपणच मिळवणार असे सांगत शेवटी मोठेपणी आपण अवकाश यात्री बनण्यासाठी अविरत कष्ट, सराव करु असेही ती पुढे बोलली.
यावेळी तिच्या आईने शाळेतील सर्व शिक्षक ,केंद्रप्रमुख धनंजय सिरसाट विस्ताराधिकारी संजय दरेकर आदिंचे आभार व्यक्त करत आपल्या मुलीकडून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच शाळाशिळांमध्ये स्पर्धेचे वातावरण तयार झाले असून व्हिजन दापोली तसेच रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सुरु असलेले सर्व उपक्रम हे विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी विधायक ठरत आहेत. गरीब होतकरु मुलांना इस्त्रो – नासावारी करणारी राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याबद्दल त्यांनी जि.प.च्या सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.
यावेळी गावचे सरपंच प्रमोद कदम, उपसरपंच रणजित चाळके, महेश कदम, दिनेश पवार, अजित कदम, हरिश्चंद्र कदम, सुरेश कलमकर, अविनाश कुडवाळकर, पालक, केंद्रप्रमुख धनंजय शिरसाट, शिक्षण विस्तार अधिकारी संजय दरेकर, आदि मान्यवरांचे हस्ते भेटवस्तू देऊन अंशुलचा गौरव करणेत आला. यासाठी कविता कोराणे, गणेश पवार, अश्विनी मोरे आणि मनोज बैकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.