(दापोली)
महिलांचं सशक्तीकरण आणि सबलीकरण व्हावं यासाठी दापोलीतील रोटरी क्लबने ब्युटी पेजंट ही स्पर्धा विद्यापीठाच्या विश्वेशवरैय्या सभागृहात आयोजित केली होती. या स्पर्धेत प्राजक्ता पिंपळे ब्युटी क्वीन ठरली तर सई सावंत ब्युटी प्रिन्सेस ठरली आहे.
अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली. यावेळी दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, उपाध्यक्ष विनोद आवळे, नगराध्यक्षा ममता मोरे, दापोली रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप खोचरे, एम. आर. शेट्ये, संदीप दिवेकर, निलेश जालगावकर, बॅंकेचे सीईओ संभाजी थोरात, रोटरीचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
या सौंदर्य स्पर्धेला स्पर्धकांचा अतिशय जबरदस्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये दोन गट तयार करण्यात आले होते. ब्युटी क्वीन आणि ब्युटी प्रिन्सेस. ब्युटी क्वीन या गटामध्ये बेस्ट स्माईलचा किताब मिळवला अश्विनी सुनील खरात हिनं, बेस्ट फोटोजनिक ठरली सायली दीपेश रसाळ, बेस्ट हेअर प्रतिमा राजेश नरवणकर, बेस्ट कॅटवॉक वैभवी विशाल मोरे, बेस्ट कॉस्च्युम अंकिता प्रतीक दळवी, बेस्ट पर्सनॅलिटी अबोली संदेश दिघे. या गटात तृतीय क्रमांक मिळवला प्रतिमा राजेश नरवणकर हिनं तर द्वितीय क्रमांकावर बाजी मारली वैभवी विशाल मोरे हिने. तर या गटात प्राजक्ता मिलिंद पिंपळे ही विजेती ठरली
स्पर्धेतील दुसऱ्या गटात म्हणजेच दापोली प्रिन्सेसमध्ये बेस्ट स्माईलचा सन्मान श्रद्धा संजय मोहिते मिळवला हिनं मिळवला तर प्रियंका अरुण महाडिक ही बेस्ट फोटोजेनिक ठरली, बेस्ट हेअर प्रचिती प्रशांत मालवणकर, बेस्ट कॅटवॉक सिद्धी संतोष कांबरे, बेस्ट कॉस्ट्यूम अंकिता शशिकांत गुरव आणि बेस्ट पर्सनॅलिटी पुरस्कार मिळवला अक्सा करामत भोंबल हिनं. या गटात तृतीय क्रमांक मिळवला पौर्णिमा विनोद खांबे हिनं तर द्वितीय क्रमांकावर बाजी मारली ऐश्वर्या चंद्रकांत कामतेकर हिनन. या गटात साई मधुकर सावंत ही विजेती ठरली.
दापोली रोटरी क्लब तर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेला स्पर्धकांबरोबरच प्रेक्षकांनी देखील उदंड प्रतिसाद दिला.