( खेड/इक्बाल जमादार )
दापोली एसटी आगारामध्ये बऱ्याच दिवसापासून पोलीस मदत कक्ष नसल्यामुळे पोलिसांची गैरसोय होत होती. त्यासाठी दापोलीतील प्रसिद्ध व्यापारी मनोहर जैन यांनी पुढाकार घेऊन सदर पोलीस मदत कक्ष बनवून दिला. याचे लोकार्पण आज दिनांक 31 जुलै 2023 रोजी दापोली आगार आगारामध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी महावीर एम्पोरियमचे मालक मनोहर जी जैन, व्यवस्थापक सौ मधाले मॅडम, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, दापोली पोलीस स्टेशनचे पीआय अहिरे व पी एस आय राजकुमार जी, पी एस आयअर्जुन यादव, अमोल अशोक गंगधर व इतर पोलीस कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारीचे स्वरूप महाजन, दापोली आगाराचे वाहतूक निरीक्षक हर्षल नाफडे, ओम शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष राकेश माळी व मंडळाचे सदस्य आणि दापोलीचे ज्येष्ठ पत्रकार सलीम भाई रखांगे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.