(दापोली)
दापोली आगार व कोकण एसटी प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, आपल्या दापोली बस स्थानक येथून दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ११.०० वाजता सदर पर्यटन विशेष सेवा श्री अष्टविनायक दर्शन बस फेरी सोडण्यात येणार आहे.
सदर बस अष्टविनायक दर्शन पूर्ण करून २८ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ १० ते १०.३० वाजता पुन्हा दापोली बस स्थानक येथे येणार आहे. सदर बस फेरीचे आयोजन दापोली आगार व कोकण एसटी प्रेमी ग्रुप यांनी केले असून सदर दर्शन फेरीचे प्रवासी १४००/- प्रौढ प्रवासी, व ७००/- हाफ तिकीट ( मुले, ज्येष्ठ नागरिक) इतक्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाश्यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन कोकण एसटी प्रेमी ग्रुप व दापोली आगार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी दापोली आगार व्यवस्थापक
१)आगार व्यवस्थापक – 9922926407
२) स्थानक प्रमुख – 7350515544
३) वाहतूक निरिक्षक- 9890438877
४) सहा. कार्य.अधीक्षक – 9422382800
कोकण एसटी प्रेमी प्रवासी मित्र
१) विकास गुरव – 9420157500
२) अपेक्षित कुळये -9892316540
३) साहिल हुंबरे – 8657374190
४) सोहम बापट – 8459706758
तसेच सदर सेवेच्या बुकिंग साठी मदत व्हावी या हेतूने एक गूगल लिंक बनविण्यात आली आहे त्यात तुमची पूर्ण माहित भरून द्यावी जेणेकरून संपर्क करणे सोपे जाईल.