( दापोली / प्रतिनिधी )
तालुक्यातील कळंबट, दाभिळवाडी येथे शेतातील विहिरीवर लावलेल्या पंपाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार रमेश दाभिळकर (43, कळंबट, दाभिळवाडी, दापोली) यांनी पोलिस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश दाभिळकर यांनी आपल्या शेतात आंब्याच्या कलमांना पाणी घालण्यासाठी विहिरीवर पंप लावला होता. 19 नोव्हेंबर रोजी रमेश हे सकाळी कलमांना पाण्यासाठी गेले असता पाण्याचा पंप दिसून आला नाही. पंप चोरीस गेल्याचे लक्षात येताच रमेश यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, शेतामध्ये विहिरीवर बसवलेला केएसबी कंपनीचा 20 हजार रुपये किमतीचा पंप अज्ञाताने चोरून नेल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.