(दापोली)
तालुक्यातील लोणवडी – हळणे येथून ३५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अस्मिता कोळंबेकर ( ३५ ) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे.
या मुंबईला जात असल्याने त्यांच्या पतीने त्यांना १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता लोणवडी येथील बसस्टॉपवर एसटीमध्ये बसवले. मात्र त्यानंतर पती कोळंबेकर यांचा अस्मिता यांच्याशी काहीच संपर्क झाला नाही. त्यांनी मुंबई येथे संपर्क साधला असता मुंबईत पोहचल्याच नसल्याचे समोर आले. सर्वत्र चौकशी करूनही न सापडल्याने त्यांचे पती कोळंबेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
अस्मिता यांची उंची ५ फुट ३ इंच व रंग निमगोरा असून लाल रंगाची साडी परिधान केली आहे. अशी व्यक्ती कोणाला आढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.