( दापोली )
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले सावने पुळण दरम्यान कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पाठलाग करत समुद्रात बेकायदेशीर डिझेल तस्करीची बोट पकडली.
या बोटीचे नाव मंगलमूर्ती असून बोटीवरील तीन खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. पकडलेली बोट जप्त करून दाभोळ बंदरात सील करून ठेवण्यात आली आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा कस्टम विभागाने बेकायदेशीर डिझेल साठा असलेली बोट पकडली आहे.
समुद्रात बेकायदेशीर डिझेल साठा असलेली मंगलमूर्ती बोट दत्ताराम भगवान कुलाबकर यांच्या मालकीची आहे. या बोटीवरील वामन रघुवीर (तांडेल )चंदू गोविंद झोप, संतोष बाळाजी झोप यांना कस्टमर ताब्यात घेतले असून अधिक तपास दापोली कस्टम विभागाचे उपायुक्त अमित नाईक एस यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या बोटीवरून 8500 लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला.
बोटीवर आढळून आलेला बेकायदेशीर डिझेल साठा नेमका कुठून आला यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचे रॅकेट आहे का याचा तपास सुरू असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता आहे तसेच या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय टोळीशी जोडले जात असल्याने दापोली कस्टम विभाग कसून तपास करत आहे.
दापोली कस्टम विभागाने एका महिन्यात दुसऱ्यांदा बेकायदेशीर डिझेल तस्करी करणाऱ्या बोटीवर कारवाई केल्याने डिझेल तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कस्टम विभागाच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे कस्टम विभागाच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
दापोली कस्टमर विभागाचे उपायुक्त अमित नायक एस यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक मित्तू , विक्रांत मलिक निरीक्षक यांनी कारवाई केली. संजय कुमार अधीक्षक, वैशाली शेळके, बी एस गायकवाड, महेंद्र प्रताप, किशोरी खरे, सर्व निरीक्षकांच्या देखरेख खाली कारवाई पार पडली. निरीक्षक राजकमल चोरसीया, शेफाली प्रधान, एस.एम आंबेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच मरीन चे 18 कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या सहकार्याने कस्टम विभागाने कारवाई फत्ते केली.