(दापोली)
बस स्थानकातून सकाळी १० वाजता सुटलेल्या पालवणीमार्गे मंडणगड बसचे स्टेअरिंग अडकल्याने तांबडी कोंडनजीक बस उजव्या बाजूला रस्ता सोडून पाच फूट खाली उतरली. या अपघातात ५ ते ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चालक नारायण मारुती कंटाळे हे बस (एमएच 06-9550) दापोली-पालवणीमार्गे मंडणगड ही बस घेऊन मंगळवारी (ता. २८) सकाळी 10 वाजता दापोली बस स्थानकातून मार्गस्थ झाले. साडेदहाच्या सुमारास तांबडीकोड पुढील वळणावरून पुढे जात असताना या बसचे स्टेअरिंग अडकले. त्यामुळे बस उजव्या बाजूला डांबरी रस्ता सोडून 5 फूट खाली उतरली. या वेळी बसमध्ये 16 प्रवासी होते. त्यातील ५ ते ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघाताची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉनस्टेबल पवार करत आहेत.