( इक्बाल जमादार )
दापोली तालुक्यातील पावनळ येथे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सुशांत किशोर परब (पावनल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र या खून प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रालाच अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कारंजाळी पावनळ या कमी वर्दळीच्या ठिकाणी एका खड्ड्यात सोमवार 2 जानेवारी सकाळी रोजी तरुणाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाबाबत घातपाताची शंका व्यक्त करण्यात येत होती. दापोली पोलिसाना याची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. तो मृतदेह सुशांत परब याचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या प्रकरणात घातपाताच्या संशयाने पोलिसांनी तपासास सुरुवात केली. सुशांत हा त्याच्या आजीकडे करंजाळी डिंगणकरवाडी येथे रहात होता. आजीकडे त्याच्याविषयी चौकशी केली असता तो मुंबई येथील मित्राला भेटायला गेला होता असे सांगितले. मित्र जयकिसन ओमप्रकाश सिंग हा सुशांतला भेटायला रविवार 1 जानेवारी रोजी रात्री करंजाळी येथे आला होता. असे पोलिसाना समजले. सुशांत याचे वडील मुंबईत रहात असून मुलाच्या खुनाची बातमी समजताच मंगळवार ३ रोजी ते सकाळी ते दापोलीत दाखल झाले. आजीकडून सुशंतच्या मित्रविषयी माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी जयकिशन याचा मोबाईल लोकेशवरून शोधले. त्याच्या लोकेशनवरून जयकिसन हा खेड येथे असल्याचे समजले. दापोली पोलिस खेड येथे पोहोचले जयकिसन याला लॉज वरून ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राथमिक तपासात जय किसन याने सांगितले की, दोघांनी रात्रीचे जेवण करून दोघे बाहेर पडले. हीच संधी साधत जयकिसन किसन याने सुशांतचा काटा काढण्याचे ठरवले. त्याप्रमाने त्याने काटा काढला. आपल इप्सित साध्य झाल्यानंतर जयकिसन याने सुशांतच्या अंगावरील सर्व कपडे काढले आणि दूर नेऊन एका झाडावर लटकवून ठेवले. त्याच्या या प्रकाराने कोणतातरी राग काढल्याचे दिसून येते.
खून केल्यानंतर जयकिसन सकाळी सुशांतच्या घरी पोहोचला. जणू काही झालेच नाही असे त्याने भासवण्याचा प्रयत्न केला. सुशंतच्या आजीचा निरोप घेऊन तो मुंबई येथे निघून गेला. असे त्याने सांगितले.
जय किसन याला पोलिस न्यायालयात हजर करणार आहेत. त्याला पोलिस कोठडी मिळाल्यास कोणत्या कारणासाठी सुशांत याचा खून केला? त्याच्या अंगावरील कपडे का काढले? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला पोलिस कोठडी नंतर उघड होणार आहेत.