( दापोली / वार्ताहर )
दापोली हर्णे येथे भटक्या कुत्र्यानी रात्रीच्या सुमारास हल्ला करुन 298 कोंबडयांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. यात माजीद महालदार यांचे दीड लाखांचेे नुकसान झाले आहे.
15 जून रोजी रात्री बारानंतर 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी दरवाजाचा दोरखंड चावून तोडला. व आत घुसून खुराड्यात असलेल्या कोंबड्यांवर हल्ला केला. त्यातील 10 ते 12 कोंबड्या उडून गडग्याच्या बाहेर जाऊन मिळेेल तेथेे लपून बसल्या होत्या. त्यामुळे त्या वाचल्या. मात्र उर्वरीत 298 कोंबड्या मारून टाकल्या होत्या. पहाटे 5 वाजता उठल्यानंतर महालदार यांच्या ही घटना लक्षात आली. या बाबत त्यांनी सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सदस्य यांना माहिती दिली. तसेच पशुसंवर्धन खात्याला या बाबत कळविण्यात आले. पशुसंवर्धन अधिकारी सुरज कोल्लाल यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.