(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
दापोली तालुक्यातील सोंडेघर या गावात २५ एप्रिल रोजी सर्वधर्मातील लोकांची मिटिंग झाली. सदर मिटिंग ला दापोली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री विवेक अहिरे हे देखील उपस्थित होते.
सोंडेघर गावातील शांतता अबाधित राहणेकरिता यावेळी चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सोंडेघर गावातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध सर्वधर्मातील लोकांनी येथून पुढे आम्ही आपापसात व एकमेकांच्या धर्माबद्दल कोणतही द्वेष न करता गोडी-गुलाबीने राहू, वादविवाद करणार नाही असा 100 वर्षांचा ठराव ग्रामपंचायत सोंडेघर मार्फत करण्यात आला.
सदर सकारात्मक चर्चेसाठी पालगड पोलीस दूरक्षेत्र अंमलदार श्री मिलिंद कदम व विकास पवार यांनी विशेष प्रयत्न केले. सामाजिक ऐक्यासाठी करण्यात आलेल्या या ठरावाने सोंडेघर गावावर दापोली तालुक्यातून सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.