( रत्नागिरी / प्रतिनिधी )
दापोलीतील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात बुधवार 7 डिसेंबर रोजी कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी व एच.डी .एफ.सी.बँक, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. निगुंडळ येथील जिल्हा परीषद शाळा क्रमांक 1 मध्ये हे शिबिर पार पडले. नागरिकांमध्ये रक्तदानविषयी जनजागृती व्हावी हे या शिबिराचे उद्दिष्ट होते.
या शिबिराला निगुंडळ येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला. कार्यक्रमाला गावच्या सरपंच श्रीमती दीप्ती गिजे, उपसरपंच सुभाष गावडे, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश भागवत, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख प्रा.हरिश्चंद्र भागडे ,ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.बी.पाटील, प्रा.निशिकांत पाकळे,विषयतज्ज्ञ प्रा.संग्राम ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदीप प्रवीण पगार, हर्ष प्रकाश शेटकर, ऋषभ किशोर दळवी, शुभम बाळासाहेब निकम, सागर शंकर दळवी, हृदय रामदास नायडू या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.