(दापोली / प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील मौजे डौली येथे ग्रामदेवता जनाई देवीच्या पालखीतील चांदीच्या नवीन मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व अभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
येथील हनुमान वाडी व ब्राम्हण वाडी क्रमांक 2 यांच्या वतीने आई जनाई माऊली पालखी चांदीच्या मूर्ती नवीन स्वरूपात तयार करून त्यांचे प्राणप्रतिष्ठा अभिषेक व श्री सत्यनारायण महापूजा सोहळा नुकताच श्री जनाई देवी मंदिर देवस्थान रहाडी व चव्हाटा देवस्थान डौली येथे पार पडला.
दापोली मंडणगड तालुका पासून 38 की.मी अंतरावर मौजे डौली गाव श्री जनाई देवी मौजे डौली गावाची ग्राम दैवत नवसाला पावणारी आई जनाई 84 गावाची मालकीण आहे डौली रहाटी येथे आई जनाई माऊलीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात आई जनाई माऊली, सातेरी देवी, कुंभारजाई देवी, व श्री देव सोमय्या (शंकर) यांचे ही पाषाण मूर्ती आहेत. खूप जुने जागृत देवस्थान आहे.
मंडणगड तालुक्यातील शेवरे गावची ग्राम देवता श्री वरदान देवी या माऊलीची बहीण जनाई माऊली आहे. या सोहळ्याचे अभिषेक सोहळा विद्यमान गुरुजी श्री विजय भाऊ करमरकर यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला. आई जनाई माऊलीचे मानाचा चौक मांडून गावकऱ्यांनी गाऱ्हाणे घालून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मौजे डौली, हनुमान वाडी, ब्राम्हण वाडी क्रमांक 2 सर्व कार्यकर्ते सभासद, महिला मंडळ, माहेर वाशिणी, तरुण मंडळीनी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश रामभाऊ शिंदे, शिमगोत्सव प्रमुख श्री चंद्रकांत विठोबा महाडिक, श्री मिलिंद रघुनाथ महाडिक, श्री श्याम शांताराम बैकर , श्री सुरेश लक्ष्मण बालगुडे, श्री संजय बाळकृष्ण शिगवण, श्री दीपक गजानन बालगुडे, श्री अमोल अनिल महाडिक, श्रीमती सुमती शंकर शिगवण, श्री राजेश नारायण शिगवण, श्री सुनील रघुनाथ करमकर, श्री संजय पांडुरंग चव्हाण, श्री महेश तुकाराम बालगुडे, श्री सुभाष गंगाराम कालेकर यांनी मोलाचे योगदान दिले.