(संगलट-खेड / इक्बाल जमादार )
दापोली तालुक्यातील फणसू येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडून चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. ही घटना सोमवारी 11 एप्रिल सायंकाळी सव्वा सहा ते मंगळवारी 12 एप्रिल सकाळी नऊच्या दरम्यान घडली. चोरट्याने चोरीसाठी खिडकीतून प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तपासासाठी रत्नागिरीतून श्वान पथक मागवले होते मात्र चोरट्यांचा माग त्याला अपयश आले.
याबाबत सागर गायकवाड, 32 रोपे बुद्रुक तालुका पंढरपूर (सध्या देगाव मराठवाडी तालुका दापोली) यांनी दापोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फणसू येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेच्या वाशरूम जवळ खिडकीचे ग्रील कापून खिडकीतून चोरट्याने बॅंकेत प्रवेश केला. रूममध्ये शेटर चे कुलूप उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरी करणे शक्य न झाल्याने चोरटा पसार झाला. ही घटना मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या निर्देशनात आली.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यांमध्ये भादवि कलम 357 380 511 अनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याचा मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीतून सेवन पथक मागवला होता मात्र त्यालाही चोरट्याचा मार्ग काढता आला नाही याबाबत दापोली पोलीस कसून तपास करीत आहे