(दापोली)
दापोली तालुक्यातील खेर्डी देऊळवाडी शितला देवी येथे नळपाणी योजनेचे उद्घाटन शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते व दापोली मतदार संघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. दापोली मतदार संघातील खेर्डी हे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या अगोदरही शिवसेने मार्फत अनेक विकास कामे या पंचक्रोशीत झालेली आहेत आणि पुढेही प्राधान्याने होत राहतील असा शब्द यावेळी आमदार योगेश कदम यांनी ग्रामस्थांना दिला
सदर कार्यक्रमाला तालुका संघटक उन्मेश राजे, उप तालुका प्रमुख प्रकाश कालेकर, माजी सभापती व महिला संघटीका दिप्तीताई निखार्गे, जि. प. सदस्या व सभापती रेश्माताई झगडे, पंचायत समिती सदस्या स्नेहा गोरीवले, दापोली नगर पंचायत नगरसेविका शिवानी खानविलकर, सुनिल दळवी, राजेंद्र बैकर, मंदार केळकर, अमित पारदले, सरपंच, शाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.