(फुणगूस/एजाज पटेल)
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षे वयोगट मुलगे कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात खेड संघाला १० गुणांनी नमवून संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालया बुरंबी-शिवने यांनी विजेतेपद पटकावले आहे. यामुळे हा संघ आता जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच खेड येथे पार पडल्या. अटीतटीच्या सामन्यात साईश पानगले व प्रणव धामणे यांच्या दमदार चढाईने दादासाहेब सरफरे विद्यालयाने विजय संपादन केला. संगमेश्वर तालुक्याचे नेतृत्व करणार्या या संघाने जिल्ह्या स्तरावर विजय प्राप्त केल्याने आता विभागीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. संगमेश्वर (बुरंबी) विरुद्ध खेड यांच्यातील रोमहर्षक सामन्यात बुरंबी संघातर्फे साईश पानगले, प्रणव धामणे ,प्रथमेश फेपडे, किरण खाके ,ऋतिक जाधव, चेतन खांडेकर यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली.
या खेळाडूंना प्रशिक्षक सहाय्यक शिक्षक सुहास पाब्ये, सुरेंद्र कुळये, सुरज जाधव, सुनिल पवार यांचे मार्गदर्शन लाभले .सुयश प्राप्त केलेल्या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अशोक सरफरे, उपाध्यक्ष राजाराम गर्दे,उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सरचिटणीस दिलीप माेरे, सचिव शरद बाईत, संचालक सचिन मोहिते, दिनेश जाधव, ललित लाेटणकर, मुख्याध्यापक प्रकाश विरकर , पर्यवेक्षक महाविर साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.