(दापोली)
लग्नामध्ये आईने दिलेल्या दागिन्यांची चोरी झाली होती. ही फिर्याद घेऊन आलेल्या महिलेच्या तक्रारीनंतर झपाट्याने कारवाई करत पोलिसांनी संशयित चोरट्याला अटक करत दागिनेही हस्तगत केले आहेत.
दापोली तालुक्यातील शिरकल येथील रंजना शिंदे यांचे दागिने २६ जून रोजी चोरीला गेले होते. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्वरित संशयित आरोपी तुषार प्रकाश सुर्वे याला अटक केली आणि तातडीने आपल्या पद्धतीने तपास सुरू केला.
बुधवारी पोलिसांनी चोरीला गेलेले दागिनेही हस्तगत केले आहेत. हे दागिने मुंबईत मालाड येथे विकण्यात आले होते. ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तपासाबद्दल दापोली पोलिसांचे कौतुक होत आहे.