(मुंबई)
कोरोना काळात दोन वर्ष दहीहंडी या सणावर निर्बंध आले होते. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लोकजागृती संस्थेच्या अध्यक्षा स्वाती सयाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दहीहंडीच्या बाबती सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी अशी मागणी केली आहे.
पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले की, २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने उत्सवातील थरावर 20 फुटापर्यंत बंधन घातले होते. हीच उंची सुप्रीम कोर्टाने ही निश्चित केली होती. परंतु २०१७ च्या एका याचिकेवरील आदेशामध्ये सुप्रिम कोर्टाने हा विषय पुन्हा उच्च न्यायालयाकडे सुपूर्त केला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने सुप्रिम कोर्टाने दिलेले गोविदांच्या सुरक्षेबाबतचे सर्व नियम बंधनाकरक राहतील आणि उंचीवरील निर्बंध सरकारने ठरवावेत असे सांगितले होते. परंतु सरकारने, यावर अजून देखील कोणतेही आदेश काढले नाहीत. दहीहंडीचा उत्सव तोंडावर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही तरी ठोस पावले उचलली अशी मागणी केली आहे.
दहीहंडी म्हणजे उंच मानवी थर होय. महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा होणारा हा सण होय. मात्र, मानवी मनोरे रचताना थरावरचे काही गोविंदा खाली पडून जखमी होतात. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. या प्रकारामुळे सरकारने या संदर्भात काही गोविदांच्या सुरक्षेबाबतचे सर्व नियम बंधनाकरक करावेत. तसेच उंचीवरील निर्बंध सरकारने ठरवावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे.