(रत्नागिरी)
रुग्णावर योग्य उपचार योग्य वेळेत होणे गरजेचे आहे. आणि यासाठी रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचवण्याचे काम करणारी १०८ ही रुग्णवाहीका अनेकांसाठी जीवनदाईनी ठरत आहे. आज २६ जानेवारी रोजी या १०८ रुग्णवाहीकेला १० वर्ष पूर्ण झाली. या १० वर्षात या रुग्णवाहीकेने १ लाख ९९ हजार २४७ रुग्णांचा जीव वाचवला आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही रुग्णवाहीका जीवनवाहीका म्हणुनच ओळखली जात आहे.
राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य विभागामार्फत बी व्ही जी इंडिया लिमीटेड या कंपनीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात १७ रुग्णवाहीकांची सेवा मोफत देण्यात येत आहे. गेली दहा वर्ष या कंपनीच्या कॉल सेंटर मध्ये आलेले आपत्कालीन कॉल तात्काळ रिसीव्ह केले जातात. या कॉलसेंटरमध्ये रुग्णांचे नाव, पत्ता, अपघाताचे ठिकाण या संदर्भातील सर्व माहीती नोंद करुन लगेचच जवळच्या रुग्णवाहीकेला ही माहिती दिली जाते. आणि तात्काळ रुग्णापर्यंत रुग्णवाहीका पोहोचण्याची व्यवस्था केली जाते. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ४ रुग्णवाहीका या आधुनिक जीवरक्षक प्रणालीने युक्त आहेत तर १३ रुग्णवाहीका सर्वसाधारण स्वरुपातील आहेत. या रुग्णवाहीकेत एक डॉक्टर आणि एक ड्रायव्हर ( ज्याला पायलट म्हणुन संबोधले जाते.) असतो, वर्षाचे ३६५ दिवस ही सेवा रत्नागिरी जिल्ह्यात सुरु आहे. ही सर्व यंत्रणा बी व्ही जी च्या जिल्हा समन्वयक आणि जिल्हा व्यवस्थापाक यांच्या मार्फत राबविण्यात येते.
उत्तम आरोग्य हे सर्वाना मिळालेले वरदान आहे. मात्र हेच आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग्यवेळी रुग्णालयात उपचार मिळणे ही सुद्धा तितकिच महत्वाची आहे. अनेक गोर-गरीब रुग्णांना योग्य वेळी रुग्णालयात पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी गेली १० वर्ष १०८ ही रुग्णवाहीका उत्तम रित्या ही कामगीरी बजावत आहे. गेल्या दहा वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील १७ हजार ९७६ बाळंतपणांच्या केसेस या १०८ रुग्णवाहीकेमार्फत सुखरुप सोडवण्यात आल्या आहेत. कित्येक प्रकरणात रुग्णवाहीकेतील डॉक्टर आणि पायलट यांनाच या डिलेव्हरी कराव्या लागल्या आहेत. तर अनेक वेळा योग्य वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने बाळ बाळंतीण सुखरुप असल्याचे दिसुन आले आहे. १०८ रुग्णवाहीकेचे जिल्हा व्यवस्थापक पवार यांनी एका वृत्तपत्राच्या संवादात बोलताना काही अनुभव सांगितले. त्यापैकीच एक म्हणजे काही महीन्यापुर्वी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातुन अचानक रात्रीच्या सुमारास एका रुग्णाला तात्काळ कोल्हापुरला घेवुन जाण्याची वेळ आली. यावेळी ऑन ड्युटी असलेल्या महिला डॉक्टर कुसुम मेटे यांनी तब्बल तिन साडेतिन तास हाती पंपीग करुन ऑक्सीजन यंत्रणा सुरु ठेवली आणि रुग्णाला सुखरुप कोल्हापूर येथे पोहोचवले.
दहा वर्षात १०८ रुग्णवाहीकेची कामगिरी
वाहनांचे अपघात ६,९३७ केस
अत्याचाराच्या घटना ४३३
जळीत प्रकरणे ६८९
हृदयविकाराचा झटका ११८३ केस
पडण्याचे अपघात २६९०
विषबाधा ४१३६
बाळंतपण १७६७६
विजेचा धक्का ५९
मोठी जिवीत हानी ५९८
औषधोपचार १३४२३७
इतर २७१०२
अपंगत्व २७५६
आत्महत्या १२५