(रत्नागिरी)
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवी २९४ कोटी ४९ लाख झाल्या असून दसरा दिवाळी ठेव योजनेत ६ कोटी ८० लाखांच्या ठेवी आज अखेर संकलित झाल्या. ४७० खात्यात नवीन ठेवी संकलित झाल्या. तर ६० खातेदार नव्याने संस्थेची जोडले गेले. दिनांक ३१ मार्च २०२३ पासून संपलेल्या ८ महिन्यात संस्थेकडे २९ कोटी ३४ लाख नव्याने ठेवी जमा झाल्या. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात ३०० कोटींचा ठेव टप्पा पूर्ण होईल असा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
स्वरूपानंद पतसंस्थेचा स्वनिधी ४२ कोटी २२ लाख इतका भक्कम असून संस्थेने वितरित केलेल्या कर्जाची वसुली ९९.३१% आहे. तर संस्थेचा NPA ०% असून संस्थेचा CD रेशो ६१.७३% एवढा आदर्शवत आहे. तर CRAR चे प्रमाण २५.३५% इतके लक्षणीय आहे. स्वरूपानंद पतसंस्था दसरा दिवाळी ठेव योजनेसोबत दिनांक १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दिवसात सहकार सप्ताहाला अनुलक्षुन दसरा दिवाळी ठेव योजना १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत वाढवली असून ठेवीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था यांनी केले असून दीपावली पर्वाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.