(संगलट-खेड / इक्बाल जमादार )
रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन मार्फत डेरवण येथे खेळल्या जाणाऱ्या 16 वर्षाखालील मैदानी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, दमामे विद्यालयाचा विद्यार्थी स्मित सुभाष बारे या नववीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्याने, उंच उडी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर100 मी. धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सेक्रेटरी महेशजी महाडिक, दमामे तामोंड ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच अर्पिता शिगवण, उपसरपंच, गंगाराम हरावडे, भडवळे गावच्या सरपंच प्रीती खरे, कात्रण गावचे सरपंच अमोल मळेकर शाळा समितीचे अध्यक्ष काका खेडेकर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विलास देवकरकर चारही गावचे सर्व ग्रामस्थ, पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्मितचे विशेष कौतुक केले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्मितने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. मुख्याध्यापक अतुल पिटले, बाळू कुलाल, सिध्देश हरावडे आदि शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले.