(नवी दिल्ली)
देशाला हादरवून सोडणा-या श्रद्धा वालकर हत्याकांडात महत्त्वाचे शास्त्रीय पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून जे अवयव जंगलात फेकले होते, त्याचे नमूने पोलिसांना हाती लागले होते. त्याचा डी. एन. ए. श्रद्धाच्या वडिलांशी मॅच झाला आहे.
मेहरौली आणि गुरुग्राममधील वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांनी हाडांचे हे नमुने जप्त केले होते. आफताबने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रद्धाच्या हाडांचे २३ नमूने मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून हस्तगत केले होते.
आफताबने लोखंडी करवतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. पोलिसांना जंगलातून सापडलेल्या २३ हाडावर अशाच प्रकारच्या खुणा आढळल्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सापडलली हाडे करवतीने कापल्याचे सिद्ध झाले.हे पोस्टमार्टम करणा-या एम्सनेही त्याचा अहवाल पोलिसांना सुपूर्द केला. आता याप्रकरणी पोलीस या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साकेत न्यायालयात आफताब विरोधात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
करवतीनं वस्तूही कापल्यावर करवतीच्या खुणा त्यावर राहतात. कापलेला भाग थोडा खडबडीत, ओबडधोबड राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या हाडांवरही अशाच खुणा आढळल्या आहेत. अशा स्थितीत सर्व हाडांचे विश्लेषण केल्यानंतर संपूर्ण शरीर करवतीने कापल्याचे डॉक्टरांनी मान्य केले आहे.