(रत्नागिरी)
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाजूला रस्त्यावर असलेल्या चहाटपरीत मोटार घुसून टपरीचे नुकसान केले. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दिनांक १४ जानेवारी) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा श्रीधर साळवी (वय ८२, रा. कसोप, मराठवाडी, रत्नागिरी) यांची जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला रस्त्यावर चहाची टपरी आहे. रविवारी अज्ञात मोटारचालकाने मोटार भरधाव वेगाने चालवून चहाच्या टपरीत घुसला यामध्ये टपरीचे नुकसान झाले. स्वतःच्या दुखापतीस व नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे