(तुळजापूर)
महाराष्ट्रची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा ऐतिहासिक सोन्याचा मुकुट गायब झाला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर झाडाझडती सुरु झाली होती. अखेर तुळजाभवानीची मुकुट सापडला.
11 डिसेंबर रोजी मंदिरातील 16 सदस्य असलेली मोजणी समितीने जुन्या तांब्याच्या पेटीतील मुकुट आणि1996 साली काढलेला फोटोतील मुकुट तोच आहे का, याची खातरजमा मुंबईतील प्रसिद्ध शासकीय सोने मुल्याकंन सदस्य आणि सुवर्णकार पुरुषोतम काळे यांनी केली. गहाळ झालेला मुकुट हा तोच आहे, अशी ओळख घटल्यानंतर या संदर्भात खुलासा करण्यात आला. सर्व समिती सदस्यांचे एकमत होऊन गहाळ झालेला देवीचा सोन्याचा मुकुट हाच असल्याचे मत झाले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना तसा अहवाल तयार करुन देण्यात आला आहे.
तुळजाभवानीचा प्राचीन मुकुट गायब झाल्याची नोंद आली कशी आणि यासंदर्भात प्रसारमाध्यमांत चर्चा झाल्यानंतर हा मुकुट कोणत्या लाकडी पेटीत कसा सापडला. याविषयी तुळजापुरात चर्चेला उधाण आले आहे.