तुर्की व सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे पाच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २० हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मागील दोन दिवसात तेथे अनेक ऑफ्टरशॉक बसले आहेत. भारतात प्रत्येक वर्षी १ हजार वेळी भूकंपाचे हादरे बसतात. यापैकी कमीत कमी दोन अडीचशे वेळा तर धरती हादरल्याचे जाणवते. आपल्या देशातील जमिनीचा जवळपास ५९ टक्के भाग भूकंपाच्या उच्च धोक्याच्या विभागात आहे. भूकंपाचा सर्वाधिक धोका हिमालयीन भागात आहे. या परिसरात तीव्र शक्तीशाली भूकंप आले आहेत, ज्याची रिश्टर स्केलवर खूप उच्च तीव्रता होती.
इंडियन टेक्टोनिक प्लेट आणि तिब्बती प्लेट एकमेकांशी जोडली जाते. त्यामुळे तेथे दबाव निर्माण होतो. यामुळे भूकंप येतो. या संपूर्ण २४०० किलोमीटर परिसरात सर्वाधिक धोका आहे. भारतीय मानक ब्यूरो (BIS)ने देशाला पाच वेगवेगळ्या भूकंप झोनमध्ये विभाजित केले आहे. देशातील पाचवा झोन सर्वात धोकादायक आणि सक्रिय मानला जातो. या विभागात येणाऱ्या राज्यांमध्ये व परिसरात विध्वंसाची सर्वात जास्त भीती असते.
कोणत्या झोनमध्ये देशाचा किती भाग?
पाचव्या झोनमध्ये देशातील ११ टक्के भूभाग आहे. चौथ्या झोनमध्ये १८% आणि तिसऱ्या व दुसऱ्या झोनमध्ये ३० टक्के. सर्वात जास्त धोका झोन ४ व ५ मध्ये असणाऱ्या राज्यांना आहे. कोणत्या झोनमध्ये कोणती राज्ये येतात हे समजणेही आवश्यक आहे. कारण एकही राज्यातील वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या झोनमध्ये येतात.
Earthquake Zone १: या झोनमध्ये येणाऱ्या भूभागात भूकंपाचा कोणताही धोका नाही.
Earthquake Zone २: भूकंपच्या झोन २ मध्ये राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि तामिळनाडुचा काही भाग येतो.
Earthquake Zone ३: या झोनमध्ये केरळ, गोवा, लक्षद्वीप समूह, उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातील काही भाग येतात. गुजरात आणि पंजाबचा भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, पश्चिम राजस्थान, मध्यप्रदेश, बिहारचा काही भाग, झारखंडचा उत्तर भाग आणि छत्तीसगडमधील काही भाग येतो. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडु आणि कर्नाटक राज्यातील काही भाग यामध्ये येतात.
Earthquake Zone ४ : चौथ्या विभागात जम्मू आणि काश्मीरचा भाग, लद्दाख, हिमाचल आणि उत्तराखंडचा काही हिस्सा येतो. त्याचबरोबर हरियाणा, पंजाब, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेशचे उत्तरेकडील भाग, बिहार आणि पश्चिम बंगालचे काही छोटे हिस्से, गुजरात, पश्चिमी घाटाजवळील महाराष्ट्राचे काही भाग आणि पश्चिम राजस्थानचा काही भाग यामध्ये येतो.
सर्वात धोकादायक Zone ५ – या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीरचा भाग (काश्मीर खोरे), हिमाचलचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातमधील कच्छ, उत्तर बिहारमधील भाग, भारताच्या ईशान्येकडील राज्ये, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह.