(संगमेश्वर / प्रतिनिधी)
शरदचंद्रजी पवार कृषि महाविदयालय खरवते – दहिवली येथील विद्यार्थिनींनी तुरळ ग्रामस्थ श्री. अरविंद जाधव तुरळ व इतर शेतकरी यांच्या उपस्थितीत बोर्डों मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. व कृषिकन्यांनी मिश्रण तयार करून त्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांना माहिती दिली.
या बोर्डो मिश्रण ( Bordeux mixture) तयार करण्याच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेल्या कृषिकन्या रोशनी तळप, हर्षदा दाभाडे संस्कृती भोईर वीणा. सी.पी. मैथिली ओ एस, आणि अंजिशा वेणूगोपाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांनी या विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिकाबद्दल चर्चाही केली व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील या विद्यार्थिनींनी सविस्तपणे दिली. शेतकरी वर्गाकडुन या विद्यार्थीनींचे कौतुक करण्यात आले. या विद्यार्थीनींना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, प्रा. एन. सी. पाकळे, प्रा. पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.