(रत्नागिरी)
तालुक्यातील चांदोर येथे गुरे चारताना तुमसर माशी चावून जखमी झालेल्या महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना बुधवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. घडली होती.
सरिता जनार्दन करसोडे (५५, रा. चांदोर उगवतीवाडी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. बुधवारी त्या गुरे चरवण्यासाठी रानात गेलेल्या असताना त्यांना तुमसर माशी चावली होती. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने सापुचेतळे येथे उपचारासाठी दाखल केले. तिथून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले होते. परंतु, उपचारांदरम्यान बुधवारी रात्री १० वा. त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे