(नवी दिल्ली)
कोविड-19 काळात रेशनकार्डबाबत अनेक घोटाळे समोर आले होते. पात्र नसतानाही अनेकांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत रेशन धान्याचा लाभ घेतला असे निदर्शनास आले. त्यामुळे सरकार आता एक महत्वपूर्णनिर्णय घेणार आहे. ज्या लोकांकडे 100 चौरस मीटरचा भूखंड असेल किंवा शहरात फ्लॅट आणि चारचाकी वाहने असतील अशा लोकांचे रेशनकार्ड सरकार बंद करणार आहे.
खेडयातील वार्षिक उत्पन्न 2 लाख आणि शहरांमध्ये 3 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्ती तसेच चारचाकी वाहने, एसी, इत्यादी वस्तू असतील अशांना आता रेशनकार्ड परत करावे लागणार आहे.
रेशनकार्डच्या आधारावर दारिद्रय रेषेखालील लोकांना सवलतींच्या दरात लाभ दिले जातात, त्यामुळे असा निर्णय आता सरकार घेणार आहे.