स्मार्टफोन वापरणाऱ्यांना फोनचा वेग कमी होण्याच्या समस्येला अनेकदा सामोरे जावे लागते. हे Android डिव्हाइसवर अनेकदा हा अनुभव येतो. जेव्हा फोन नवीन असेल तेव्हा त्यात अशी कोणतीही अडचण येत नाही, परंतु काही कालावधीनंतर तो स्लो होऊ लागतो. फोनमध्ये रॅमची कमतरता हे देखील याचे एक मोठे कारण असू शकते. यासोबतच डिव्हाइसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त अॅप्स भरल्यामुळेही ही समस्या उद्भवते. जर तुम्हीही तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनच्या स्लोपणामुळे हैराण असाल तर या काही ट्रिक्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन पुन्हा स्पीडी बनवू शकता.
1. अनेक लोक फोनच्या होम स्क्रीनवर खूप जास्त अॅप्स ठेवतात, असे केल्याने फोन बिझी राहतो. होम स्क्रीन नेहमी फ्री ठेवा. तसेच लाइव्ह वॉलपेपर वापरू नका. यामुळे बॅटरी संपते आणि फोन स्लो होण्याचा धोका असतो.
2. जर तुमच्या फोनमध्ये स्टोरेज आणि रॅम कमी असेल तर तुम्ही तुमच्या फोनची जंक फाइल काढून फोन fast करण्यासाठी Google Files Go अॅप वापरू शकता. हे अॅप तुम्हाला न वापरलेले अॅप्स काढून टाकण्यासही मदत करते.
3. अँड्रॉइड फोनमध्ये अनेक गुगल अॅप्स आहेत, ज्यांची आपल्याला गरज नसते. जसे- Google Movies, Google Music, Google Play Newsstand, Google News & Weather, Google Keep, Google Duo यामधून आवश्यक नसलेल्या काढून टाका किंवा सेटिंग्जमध्ये जाऊन ते डिसेबल करा.
4. पूर्वी फेसबुक लाइट आणि मेसेंजर लाइट हेच अॅप्स होते, पण आता गुगलनेही अनेक लाइट अॅप्स जारी केले आहेत. त्याच वेळी, तुम्ही YouTube Lite, Skype Lite, Linkedin Lite, Mobile Twitter सारखे अनेक लाइट अॅप वापरू शकता. लाइट अॅप्स खूप कमी स्टोरेज वापरतात.
5. नेहमी तुमच्या फोनचे अपडेट्स तपासत राहा. अपडेट नोटिफिकेशन येत असले तरी आपण त्याकडे अनेकवेळा दुर्लक्ष करतो. अपडेटनंतर फोनच्या अनेक समस्या दूर होतात आणि फोन सुरळीत चालतो. अपडेट केल्यानंतर फोनही सुरक्षित होतो.
6. कधीकधी आपण ब्लूटूथवर काहीतरी शेअर करतो आणि ते चालू ठेवतो. असे केल्याने फोनचे आयुष्य तसेच बॅटरी खराब होते. याशिवाय गरज नसताना वाय-फाय बंद करा. यामुळे फोनही स्लो होत असतो.