(संगमेश्वर / प्रतिनिधी)
साखरपा येथील तिवरे मेढे येथे आकस्मिक मृत्यू झालेला अल्पवयीन महाविद्यालयीन युवक श्रेयस रवींद्र ढवळ यास तीवरे मेढे बौद्धजन सुधारक मंडळ व पंचशील महिला मंडळ व युवक मंडळ यांचे वतीने शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
तिवरे मेढे बौद्ध वाडीमध्ये सोमवारी (दिनांक 29 मे रोजी) सायंकाळी शोक सभेचे आयोजन संजय सोमा कांबळे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी शोक सभेला कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार काका जोयशी, बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत भायजे, तू ग गांधी विद्यालयाचे शिक्षक रामचंद्र घाणेकर, कोंडगाव ग्रामपंचायतचे सदस्य जितेंद्र जोशी, मंगेश जोशी तसेच बापू ढवळ, लोकनेता चॅनेलचे विकास चव्हाण, मंडळाचे पुरुष, महिला, युवक ,सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
तिवरे गावातील रामवाडी येथे श्रेयस रवींद्र ढवळ याचा वयाच्या सतराव्या वर्ष मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने ढवळ कुटुंबीयांवर त्याचबरोबर संपूर्ण गावावर फार मोठे दुःख कोसळले. त्यामुळे त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी बौद्धवाडीने एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शोकसभा आयोजित करून मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.
बुद्धांच्या उपदेशाचे पालन करावे
■ दरम्यान अखंड महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्याचा हा एकमेव कार्यक्रम असल्याची प्रतिक्रिया प्रबोधनकार काका जोशी व गणपत पाहिजे यांनी व्यक्त केली.
■ तर दुःख निवारणासाठी बुद्धाच्या उपदेशाचे पालन करावे असे मत घाणेकर यांनी शोकसभेत बोलताना व्यक्त केले.
अनिष्ट गैर मार्गाचा वापर टाळावा
कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल ढवळ कुटुंबीयांच्या वतीने मंडळाचे आभार व्यक्त करताना शब्द तोकडे पडतात अशी प्रतिक्रिया उपस्थित बांधवांनी व्यक्त केली. तसेच सर्व युवक वर्गाला मार्गदर्शन करताना अध्यक्ष संजय सोमा कांबळे यांनी चांगले शिक्षण स्वतःचा समाजाचा उद्धार करा. अनिष्ट गैर मार्गाचा वापर टाळावा समाजाला युवकांचे खऱ्या अर्थाने गरज असल्याचे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दीपक कांबळे यांनी केले.