( रत्नागिरी / निलेश कोकमकर )
तिल्लोरी कुणबी बांधवांच्या जातीचा दाखला मिळणेसाठी निर्माण होणा-या त्रुटींचे निवारण करणेसाठी समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी येथे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थिती जातपडताळणी समितीचे अध्यक्ष सौ. पडियार व उपायुक्त श्री.प्रमोद जाधव आणि सदस्य सचिव संतोष चिकणे तसेच कुणबी समाजाचे शिष्ट मंडळ याचे समवेत गुरुवारी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात तोडगा काढण्यात आला असून आयोग्याच्या काही तांत्रिक अडचणी असल्याचे निर्दशनास आले.
रत्नागिरी जिल्हयामध्ये मागस वर्गीय आयोगाच्या झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष यांनी तिल्लोरी कुणबी असा उल्लेख असलेल्या पुरावाधारक बांधवांना ओबीसी देण्यात येऊ नये, असे तोंडी आदेश दिल्यामुळे तिल्लोरी कुणबी बांधवांना ओबीसी दाखले देणे बंद करण्यात आले. त्या अनुषंगाने झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी लक्षवेधी मांडून सदर बाब निदर्शनास आणली. मांडलेली लक्षवेधी क्रमांक २१५६ च्या अनुषंगाने सभागृहामध्ये इतर मागासवर्ग मंत्री नाम.अतुल सावे यांनी तिल्लोरी कुणबी बांधवांच्या जातीचा दाखला मिळणेसाठी निर्माण होणाऱ्या त्रुटींचे निवारण करण्यासाठी आपण अधिका-यांच्या समवेत आपल्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासित केले होते.
त्यानुसार आमदार डॉ.राजन साळवी यांनी सदर बैठकीमध्ये निदर्शनास आलेल्या तांत्रिक अडचणीची बाब लक्षात घेता तातडीने इतर मागासवर्ग मंत्री नाम.अतुल सावे यांना पत्रव्यवहार करून संबंधीत आधिकारी वर्ग व कुणबी समाजाचे शिष्ट मंडळ यांचे समवेत त्यांचे दालनामध्ये संयुक्त बैठक मिळणेबाबत कळविले असून लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल, असे सांगितले.
सदर बैठकीमध्ये जात पडताळणी समिती अध्यक्ष पडियार, उपायुक्त प्रमोद जाधव, सदस्य सचिव संतोष चिकणे, कुणबी समाजाचे चंद्रकांत बावकर, सुजित झिमण, मिलिंद सनगरे, अँड. महेंद्र मांडवकर, गणेश जोशी, चंद्रकांत परवडी, दीपक नागले, गजानन चाळके, विजय सांडीम, संदीप डाफळे, संतोष हातणकर, मंगेश मोभरकर, सूर्यकांत गोताड, अजय पाष्टे, अनंत ठेपसे, सचिन गिजबिले, विकास पेजे, सलील डाफळे व मान्यवर उपस्थित होते.