(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील महिला नेतृत्व राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे हे वेळोवेळी दिसून येत असले तरी राष्ट्रभक्ती व प्रखर राष्ट्रवाद जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या संगमेश्वर तालुका उपाध्यक्षा सौ. रुपाली रुपेश कदम या पहिल्याच महिला आहेत. माजी जि.प. अध्यक्षा सौ. रश्मीताई कदम यांचा सामाजिक कार्याचा व विकासाचा वारसा अव्याहतपणे प्रयत्न करणार्या सौ. रुपाली कदम यांच्या पुढाकाराने संगमेश्वरमधील कनकाडी जि.प. गटात दिनांक 4 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्तता समारंभानिमित्त केंद्र शासनाकडून आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जाणीवजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे.
यामध्ये कनकाडी जि.प. गटातील सर्व गावांमध्ये तिरंगा रथ फिरणार असून आपल्या देशाची शान असलेल्या तिरंगा ध्वजाच्या सन्मानार्थ या यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन आपल्यातील राष्ट्रीय भावनेचे अभूतपूर्व दर्शन घडवावे असे आवाहन यानिमित्ताने सौ. रुपाली कदम यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन संबंधितांना कळविण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.