(संगमेश्वर / प्रतिनिधी)
नागपूर ते मडगांव रेल्वेतून प्रवास करणाऱ्या तिकीट चेकरच्या बॅगेतील रक्कम चोरीस गेल्याची घटना चिपळूण रेल्वे स्टेशनदरम्यान गुरुवारी घडली. या प्रकरणी एकावर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जगदीश वसंत खरात असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत टीसीने फिर्याद दिली आहे. ते २५ जुलैला नागपूर ते मडगांव या रेल्वेने टीसी म्हणून ड्युटी बजावत असताना त्यांनी रेल्वे प्रवाशांकडून जमा केलेली दंडाची रक्कम सोबतच्या बॅगमध्ये ठेवली होती; मात्र प्रवासादरम्यान संशयित जगदीश खरात यांनी ती रक्कम चोरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार खरात याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.