( देवरुख / वार्ताहर )
शहरातील महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत साखरपा येथील गिरजाई डान्स गृपने प्रथम क्रमांक पटकवला. हा डान्स ग्रुपमागील १५ वर्षे कोंडगाव – साखरपा गावात कथ्थक नृत्याचे धडे घेत आहे. यांना गुरु अशोक आखाडे, सोनाली आठल्ये, रेश्मा जाधव यांच्या कडून क्लासिकल शिक्षण मिळत आहे. याठिकाणी तंत्रशुद्ध पद्धतीने नृत्य शिकवले जाते.
ट्रस्ट’ तर्फे दरवर्षी होणाऱ्या समुहनृत्य स्पर्धेत गिरजाई ग्रुप साखरप्याने आज गेली १५ वर्षे आपली गुणवत्ता टिकून ठेवली आहे .आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेत यंदा देखील हा ग्रुप विजयी झाला आहे. या ग्रुप मध्ये विशेष कृष्णाची भूमिका गेली १५ वर्षे करणारी निधी लोध, आकर्षक नृत्य आविष्कार करणाऱ्या सानिका जामसंडेकर आणि वेदिका बांडागळे यांच्यासोबत गार्गी शिंदे, त्रिषा शिर्के जोयशी, देवयानी पवार, नभा चव्हाण, प्राची, श्रुतिका गमरे, आर्या हेगिष्टे, ऋतुजा कुंभार यांचा समावेश आहे.
या सर्व यशाचे श्रेय श्री. गुरू आखाडे व सर्व पालक वर्गाला जाते असे यावेळी या ग्रुपकडून सांगण्यात आले. याचप्रमाणे साखरपा परिसरातील मुलांना शास्त्रीय शिक्षण मिळवून देण्यासाठी व क्लास सुरू करण्यासाठी पद्मा कन्या शाळेतल्या उप शिक्षिका सौ. बांडागळे मॅडम या मेहनत घेतात.साखरपा कोंडगाव येथे कथ्थक, हार्मोनियम, गायन यांसारखे क्लासेस सुरू आहेत. स्वरूप जोगळेकर यांच्या माध्यमाने ‘तबला’ क्लासही सुरू आहे.