( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील छत्रपती शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरी येथील खेळाडूंनी सुयश संपादन केले आहे. दरवर्षी शासनामार्फत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याच निमित्ताने यंदा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या 11 खेळाडूंनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. यातील पाच विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर यश संपादन केले असून त्यातील चार विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. यामध्ये 14 वर्षाखालील मुलीमध्ये स्वरा शिंदे हीने 42 kg वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला. मुलांच्या गटात तिघांनी यश मिळवले आहे. यामध्ये चेतन पाटील याने 35 kg वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला त्याची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. अभिनव जाधव याने 45 kg वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला त्याची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. आणि विकास पाटील – 62 kg वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची देखील जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. तसेच 17 वर्षाखालील मुलांमध्ये स्मित आग्रे याने 54 kg वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला असून त्याची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक स्वतः कुस्तीपटू असलेले श्री मारुती दगडू पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ शुभांगी गावडे मॅडम गावडे, आजीव सेवक तथा कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, आजीव सेवक व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शशिकांत काटे यांच्याबरोबर हे संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे सर्व शिक्षक या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक मारुती पाटील यांचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.