(पुणे)
हिंदी मनोरंजन विश्वात 2008 पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. या मालिकेने कधीकाळी प्रसिद्धीचा उच्चांक गाठला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तारक मेहता ही मालिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती.
मात्र सध्या या मालिकेचा वाईट काळ सुरू आहे. अनेक कलाकार या मालिकेच्या निर्मात्यावर आणि प्रोडक्शन हाऊस बाबत तक्रारी करत आहेत. या मालिकेतील एका स्त्री कलाकारने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तर मालिकेच्या सेटवरही योग्य वागणूक मिळत नसल्याचं अनेक कलाकारांनी सांगितला आहे .
हे सगळं एकीकडे सुरू असताना, 2017 पासून प्रेग्नेंसी रजा घेऊन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेली दयाबेन अर्थातच दिशा वाकणी या मालिकेपासून दूर गेली होती. या अभिनेत्रीला या मालिकेत तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या आवाजामुळे प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. गेल्या सहा वर्षापासून ती या मालिकेपासून दूर झाल्याने मालिकेच्या टीआरपीवरसुद्धा परिणाम झाल्याचे दिसून आलं.
My dear Behena __________ aayegi?
Fill in the Blanks with your thoughts!!!
Watch TMKOC tonight to know the answer!!#TMKOC #TMKOCWorld #TMKOCMiniIndia #GokuldhamUniverse #TMKOCComedy #Entertainment #comedy #comedyshow #funtimes @sabtv @SonyLIV @AsitKumarrModi pic.twitter.com/qQpKEgUU6p— Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (@TMKOC_NTF) July 17, 2023
दिशा वाकणी हिने मालिका सोडली अशा प्रकारच्या बातम्याही मध्यंतरीच्या काळात येत होत्या. दयाबेन आपल्या आईसोबत अहमदाबादला गेली आहे, असं चित्र मालिकेत गेल्या पाच वर्षापासून दाखवले जात आहे. दया बेन परत कधी येणार हा प्रश्न प्रेक्षकांनाही सतावत होता. आता या प्रश्नाचं काही अंशी उत्तर मिळाले आहे. पिंकविलाच्या बातमीनुसार दिशा वाकणी यावर्षी दिवाळी पर्यंत शो मध्ये परत येऊ शकते. मात्र या बातमीवर मालिकेच्या निर्मात्याकडून कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही .
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या सध्याच्या कथानकामध्ये जेठालाल दयाबेनला खूप मिस करत असून, यावर दयाबेन लवकरच गोकुलधाममध्ये परत येईल अशी घोषणा करताना दिसत आहे. त्यामुळे दयाबेन खरंच मालिकेत परत येणार का या चर्चांना आता पेव फुटले आहे.