( रत्नागिरी )
मुंबई विद्यापीठांतर्गत रत्नागिरी झालेल्या मुंबई आणि कोंकण झोनच्या पुरुष व महिला तायक्वाँदो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महीला संघाने ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावले.
ही स्पर्धा मुंबई विद्यापीठ मुंबई आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने झाली होती. या स्पर्धेत तीस महाविद्यालयांमधील ७० पुरुष आणि २७ महिला खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या महीला खेळाडूंमध्ये सानिका नारकर (सुवर्ण पदक), प्रसन्ना गावडे (कांस्य), तर पुरुष खेळाडूंमध्ये सुजल सोळंके (सुवर्ण पदक), वेदांत चव्हाण (रौप्य पदक), राज सवांतदेसाई (रौप्य), सुमित पवार (सुवर्ण), सहील आंबेरकर (रौप्य) यांनी पदक पटकावली.
या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धेकरिता आणि अखील भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो संघ निवड चाचणी करीता निवड झाली. या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, राकेश मालाप, प्रशांत मकवना, शारुख शेख यांचे मार्गदर्शन तर राम कररा, शशांक घडशी यांचे सहकार्य लाभले. या खेळाडूंना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागाचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील व क्रीडा विभागातील सहकारी सेवक, व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.