(संगलट-खेड/इक्बाल जमादार )
खेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये काम करणारे श्री सुनील येलवे यांची बदली नुकतीच दापोली येथे पुरवठा विभाग गोडाऊन व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील येलवे हे गेल्या सहा वर्षापासून खेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये काम करत होते. ते एक उत्तम अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडून सर्वसामान्य लोकांची कामे उत्तमरीत्या केली जात होती.
कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक लोकांना चांगली सेवा दिली. गेल्या सहा वर्षांमध्ये पुरवठा विभागामध्ये काम करताना त्यांनी अनेक लोकोपयोगी सेवा पुरवल्या आहेत. सुनील येलवे यांनी नुकताच दापोलीमध्ये गोडाऊन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांचा काल निरोप सभारंभ खेड तहसीलदार प्राजक्त घोरपडे यांच्या हस्ते नारळ शाल व भेटवस्तू देऊन करण्यात आले.