( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर अपघात झाला. झोप अनावर झाल्याने कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊ दरीत कोसळला. सुदैवाने झाडावर आदळल्याने बावनदीत जाता जाता बचावला. प्रसंगावधान राखत चालकाने कंटेनर मधून उडी मारल्याने थोडक्यात बचावला.
सविस्तर वृत्त असे की, मुंबई – गोवा महामार्गावरून एक कंटेनर संगमेश्वर हून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. तळेकांटे येथील गणेश मंदिराजवळ कंटेनर आला असता चालकाला झोप अनावर झाल्याने डुलकी लागली. यावेळी कंटेनर खालच्या बाजूला जाऊन दरीत कोसळला. खालच्या डाव्या बाजूला एका मोठ्या झाडाला अडकल्याने तो बचावला. त्याने लगेचच कंटेनर मधून उडी मारली. चालकाचा सुदैवाने समोर वाहन न आल्यामुळे तो खालच्या बाजूला घुसला अन्यथा एखाद्या वाहनावर जोरदार आदळून मोठा अपघात झाला असता. अपघातानंतर सकाळच्या सुमारास वाहतूक काही काळ ठप्प होती. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांचीही गर्दी झाली होती.