(पाचल / तुषार पाचलकर )
जवळेवर मार्गावरील तळवडे येथील पुलासाठी बजेट मधून १ कोटी १४ लाख मंजूर झाले. पुलाचे कामही जानेवारी २०२३ पासुन सुरू आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून सदर पुलाचे काम अचानक बंद करण्यात आले आहे.
आज या पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय राजापूर येते याबाबत सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न होतं असताना काही ना काही न पटणारी, उडवाउडवीची उत्तरं सार्व. बांधकाम उपविभागाकडून देण्यात येतं आहेत. जर या दोन दिवसात पुलाच्या दुरुती बाबत कामाला सुरवात झाली नाही तर स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.